सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

बेकरी उत्पादने
दूधाच्या मुबलकतेमुळे कोल्हापुरात याला जोडधंदा म्हणून बेकरीची उत्पादने सुरू झाली आणि अल्पावधीतच यातील अनेकांनी बेकरी व्यवसायात जोरदार मुसंडी मारली आहे. यळगूड डेअरीची ब्रेड, बटर, टोस्ट, खारी, बिस्कट्स, केक असे अनेक पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आहेत. या क्षेत्रात नांदणीची गणेश बेकरी, कोल्हापूरची भारत बेकरी, हिंदुस्थान बेकरी व केदारलिंग बेकरी यांची उत्पादनेही आपला उत्कृष्ट दर्जा व गुणवत्तेमुळे लोकप्रिय झाली आहेत. अन्यही अनेक लहान-मोठे बेकरी व्यावसायिक आपापला ग्राहकवर्ग राखून व्यवसायात अग्रेसर होत आहेत. एकंदरीतच कोल्हापूर जिल्ह्यात बेकरी व्यवसायाने चांगलेच बाळसे धरले आहे.