जैन स्वामी मठ

हा मठ शुक्रवार पेठेत असून गंगावेशपासून थोड्याच अंतरावर आहे. या प्राचीन मठाचे प्रवेशव्दार (नगारखाना) जुन्या राजवाड्याच्या नगारखान्यासारखाच असून अतिभव्य व आकर्षक राजवाड्याच्या नगारखान्यासारखा असून अतिभव्य व आकर्षक आहे. या नगारखान्याच्या मोठ्या खांबावर आधारित मनोरे आहेत. नगारखान्याची मुख्य कमान भव्य व सुंदर नगारखान्यास शोभेल अशीच आहे. हा नगारखाना सुमारे ९० वर्षापूर्वी मठाधिपती लक्ष्मीसेन महाराज यांनी बांधला. संपूर्ण काळया पत्थरात बांधलेला हा नगारखाना ६५ फूट उंचीचा आहे.

म ठाच्या मध्यभागी मोकळी जागा असून सभोवताली नगारखान्याला जोडणाऱ्या इमारती आहेत. या इमारतींचा व नगारखान्याचा मठ म्हणून वापर केला जातो.
या मठात अलिकडे काही वर्षापूर्वी सुमारे २० ते २२ फूट उंचीची भगवान पार्श्वनाथ यांची संगमरवरी भव्य अशी मूर्ती स्थापन केलेली असून ही मूर्ती तितकीच सुंदर व आकर्षक आहे.