सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

कोल्हापुरचे ऐतिहासिक चौक

कोल्हापूर शहरात अनेक चौक आहेत. पण त्यापैकी काही चौक ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे असून आजही कोल्हापुरच्या दैनंदिन जीवनात ते आपले स्थान टिकवून आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर आहे तो बिंदू चौक. पूर्वी कोल्हापूर शहराचे संरक्षण करण्यासाठी शहराभोवती रूंद असा दगडी कोट होता. कोटाच्या भिंतीला समान अंतरावर 45 बुरूज व बाहेरच्या बाजूस खोल खंदक होता. बुरूजास ठिकठिकाणी प्रवेशद्वारे होती. यापैकी रविवार पेइ बुरूजाच्या प्रवेशद्वाराजवळचा चौक मिरची बाजार म्हणून प्रसिद्ध होता.

या चौकात ब्रिटिशांविरूद्धच्या स्वातंर्त्यासाठीच्या लढय़ामध्ये भारत छोडो चळवळ जोरात असताना 15 ऑगस्ट, 1942 मध्ये एका सभेचे आयोजन झाले होते. ब्रिटिशांनी ही सभा उधळून लावण्यासाठी करवलेल्या लाठीहल्ल्यात सभेसाठी आलेला बिंदू नारायण कुलकर्णी हा युवक हुतात्मा झाला. त्याच्या

स्मरणार्थ मिरची बाजार म्हणून ओळखल्या जाणार्‍या या चौकाचे बिंदू चौक असे नामकरण उत्स्फूर्तपणे झाले.

.