सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक - बाबुजमाल दर्गा

महालक्ष्मी मंदिरापासून काही अंतरावर ताराबाई रस्त्यावर असलेल्या पार्किगच्या जागेजवळ हा कोल्हापुरातील प्रसिद्ध दर्गा आहे. या दग्र्याचे बांधकाम कोल्हापुरात जेंव्हा प्रथम मुस्लीम आले त्या काळात झाल्याचा अंदाज आहे. हा दर्गा शहरातील सर्व हिंदू मुस्लीम समाजाचे श्रद्धास्थान आहे. मोठय़ा संख्येने मुस्लिमांबरोबरच हिंदू लोकही श्रद्धेने या दग्र्याच्या दर्शनासाठी येतात. मोहरम सणामध्ये येथील पीर व पंजे हे एक मोठे आकर्षण असते.

दग्र्यामध्ये जाण्यासाठी एक मोठे प्रवेशद्वार असून त्याचा वरील भाग काढून टाकण्यात आलेला आहे. दग्र्यासभोवती असलेल्या मोकळ्य़ा जागेत छोटय़ा छोटय़ा इमारती आहेत. येथे पूर्वी एखादे हिंदू मंदिरही असावे. मुख्य दर्गा मध्यभागी असून हा नेहमीच्या मुस्लीम पद्धतीचा आहे. मध्यभागी मोठा घुमट असून चारही बाजूला लहान घुमट आहेत. या दग्र्यास मुस्लीम रूढीप्रमाणे संपूर्ण पांढरा रंग देण्यात आला आहे. या दग्र्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या दग्र्याच्या चौकटीवर कोरण्यात आलेली गणपतीची मूर्ती होय. या दग्र्याचा उरूस मोठय़ा उत्साहात साजरा होतो.