सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

कोकण घाट
पर्यटकांना खुणावतोयकोकण घाटसह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कोल्हापूर, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना मध्यवर्ती असलेलं तर कोकण व घाट अशा दोन्ही ठिकाणचा पगडा असलेले निसर्गसंपन्नतेन बहरलेल गाव म्हणजे 'आंबा' महाराष्ट्र शासनान पर्यटन स्थळांच्या यादीत आंबा परिसराचा समावेश केला आणि महाराष्ट्राच्या नकाशावरील 'आंबा गिरिस्थान पर्यटन केंद्र' म्हणून आले.

विशालगड पर्यटनाचा आनंद लुटताना जंगल सफर घडते. यापेळी महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेखरु, राज्य

फूल जाऊळ, राज्यपक्षी 'हरेल' पाहावयास मिळतात. वाघ, सांबर, हरीण, गवा रेडा, डुक्कर, साळींदर व अन्य जंगली पशु-पक्षी पाहावयास मिळतात. आंबा, मानोली परिसरातील जंगल हे सदाहरित प्रकारात मोडत असल्याने मोठ्या वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. मोठय़ा झाडांच्या ढोलीत राहणारा सर्वात मोठा उडणारा पक्षी महाधनेश (हॉर्नबिल) आंबा परिसरात हमखास दिसतो. छतपती शिवराय आणि नरवीर बाजीप्रभू, फुलाजी प्रभू यांच्या ज्वलंत इतिहासाने पावन झालेला किल्ले विशाळगड व धारातीर्थ पावनखिंड पाहाण्यासाठी आंबा मार्गेच पर्यटक जाणे पसंत करतात.