इतिहासाच्या पानापानातून

एखादे शहर ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक वा राजकीय क्षेत्रामध्ये प्रगत व उन्नत होते त्यावेळी त्या शहराची सुरुवात व इतिहास जाणून घेण्याची जिज्ञासा नागरिकांना व प्रवाशांना न वाटली तर नवल ! प्रत्येकाला आपल्या शहराच्या पूर्वेतिहासाबद्दल औत्सुक्य असते परंतु ज्ञान असतेच असे नाही. कारण शहराचा इतिहास व ऐतिहासिक घटना एकत्रित केलेल्या फार पिचतच आढळतात. म्हणून या ठिकाणी कोल्हापूर शहराचा इतिहास थोडक्यात फार खोलात न जाता दिलेला आहे.

कोल्हापूर शहर किती जुने आहे? याचे उत्तर अगदी सोपे आहे. म्हणजे चालू असलेल्या इसवीसनाइतके कोल्हापूर जुने आहे असे केव्हाही म्हणता येइ्रर्ल. याचा अर्थ, इसवीसनाच्या आरंभापासूनच कोल्हापूरच्या इतिहासाचा आरंभ होतो. कोल्हापूरच्या इतिहासाचे प्रामुख्याने तीन कालखंड पाडले जातात. हे कालखंड ज्ञान असलेल्या सुमारे दोन हजार वर्षामधील इतिहासाचे आहेत. त्यापूर्वीची म्हणजे इसवीसनापूर्वीची माहिती तितकीशी उपलब्ध नाही. शिवाय तिला फार महत्त्वदेखील नाही. म्हणून इ. स. आरंभापासूनचाच काल कोल्हापूरच्या इतिहासात गृहीत धरला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »