उदे गं अंबे

उदे गं अंबे उदे गं
उदे गं अंबे उदे गं —- ध्रु —-

कोल्हापूरवासिनी उदे गं
करवीरवासिनी उदे गं
रूप तुझे हे गोजिरवाणे
सकला पाहूदे गं —-
उदे गं अंबे — १

जगन्माऊली सकलजनांची
अंबा पुजूदे गं
नामाचा तव महिमा
सकला मिळूनी गाऊदे गं —-
उदे गं अंबे — २

भक्तिरसाच्या आनंदामधि
सकला न्हाऊदे गं
सकलजनांची मायमाऊली
सेवा तव करूदे गं —-
उदे गं अंबे — ३

प्रीती ऐशी सकलांवरती
अखंड राहूदे गं
अंबामाते कृपादृष्टी तव
सकला लाभूदे गं —-
उदे गं अंबे — ४

तव प्रसादा सकलजनांना
वाटून देऊदे गं
स्त्रीशक्तीचा महिमा सकला
पटवून देऊदे गं —-
उदे गं अंबे — ५

सकलजनांच्या कल्याणाची
आरती गाऊदे गं
शांती नांदो सकल जगामधि
आशिष मागूदे गं —-
उदे गं अंबे — ६

सुमनांची ही माला
सुंदर चरणी वाहूदे गं
उदे गं अंबे उदे गं
उदे गं अंबे उदे गं —-
उदे गं अंबे — ७
– सौ. शुभांगी सु. रानडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »