कपिलेश्वर मंदिर
फार पूर्वीपासून काशी विश्वेश्वर हे मंदिर महालक्ष्मी मंदिराच्या उत्तर बाजूस उभे आहे. मंदिर घाटीदरवाजा परिसरात असून आतील श्री शंकराच्या पिंडीला काशीविश्वेश्वर असे म्हणतात. प्राचीन काळी या मंदिरात अगस्तीमुनी, लोपामुद्रा, राजा प्रल्हाद, राजा इंद्रसेन यांनी दर्शन घेतल्याचा पुरावा करवीर माहात्म्य ग्रंथात आढळतो.
पूर्वी या मंदिरासमोर काशी आणि मणकर्णिका कुंड अशी दोन पवित्र कुंडे होती. सध्या त्यापैकी मणकर्णिका हे कुंड पूर्णपणे मुजवून त्या कुंडावर महानगरपालिकेेने महालक्ष्मी उद्यान नावाची बाग १९६२ पासून सुरू केली आहे. काशी विश्वेश्वर या मंदिरातील आतील गाभारा १० बाय १० चा असून बाहेरील दुसऱ्या छोट्या मंडपात एक प्राचीन भुयार असून यात पूर्वी ध्यानाची गुहा असल्याचे बोलले जाते.
तर प्रवेश मंडपात गणपती व इतर लहान लहान मूर्ती असून मंदिराच्या समोर तुळशी कट्टा आहे. या मंदिराला लागूनच एक छोटे मंदिर असून त्यात ज्योतिबाची मूर्ती आहे. हे मंदिर ६ ते ७ व्या शकताच्या कालावधीत बांधली असावीत. नवव्या शतकात राजा गंडवादिक्ष याने या मंदिराचा विस्तार केला.