खिरापतीला काय गं

कोल्हापूर अंबा माय गं
खिरापतीला काय गं ? —- १

वंदिन तुझे पाय गं
खिरापतीला काय गं ? —- २

लेक आली हाय गं
खिरापतीला काय गं ? —- ३

गुणाची माझी बाय गं
खिरापतीला काय गं ? —- ४

साखर जश्शी साय गं
खिरापतीला काय गं ? —- ५

लाडू चिवडा खाय गं
खिरापतीला काय गं ? —- ६

दारी बांधली गाय गं
खिरापतीला काय गं ? —- ७

प्रेमळ जश्शी माय गं
खिरापतीला काय गं ? —- ८

दुधाला वाण नाय गं
खिरापतीला काय गं ? —- ९

लोणी तूप खाय गं
खिरापतीला काय गं ? —- १०

तिखट्ट हाय हाय नाय गं
खिरापतीला काय गं ? —- ११

ओळखणार तुम्ही हाय गं
खिरापतीला काय गं ? —- १२

सांगणार मी नाय गं
खिरापतीला काय गं ? —- १३

हारलात म्हणू काय गं ?
खिरापतीला काय गं ? —- १४
– सौ. शुभांगी सु. रानडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »