चंद्रकांत मांडरे कलादालन
करवीर नगरी ही कलानगरी म्हणूनच प्रसिद्ध आहे. या नगरीचे एक सुपूत्र म्हणजे मांडरे बंधू. चंद्रकांत मांडरे आणि सूर्यकांत मांडरे या बंधूनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक वेगळा ठसा उमटविला.
श्री. चंद्रकांत मांडरे हे उत्कृष्ट अभिनयाबरोबर उत्कृष्ट निसर्गप्रेमी चित्रकार म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी काढलेल्या असंख्य निसर्गचित्रांची एक आर्ट गॅलरी राजारामपुरी कोल्हापूर येथे तयार केली आहे. अत्यंत उत्कृष्ट असे चित्र व प्राचीन वस्तु संग्रहालयासाठी १० ते १५ लाख रूपये खर्च आला. तथापि हे संपूर्ण स्वत:च्या मालकीचे दालन श्री. चंद्रकांत मांडरे यांनी महाराष्ट्न् शासनाच्या पुरातत्व खात्याकडे वर्ग करून राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा एक आदर्शच उभा केला. हे कलादालन करवीरचे आकर्षण ठरले आहे.