झोपडपट्ट्यांचा प्रश्न
सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.
शहरामध्ये गेल्या तीन दशकात झोपडपट्टी व झोपडीधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या
इ.स.२०००-२००२ च्या पर्यावरणविषयक अहवालानुसार शहरात ८९७७ झोपड्यांमध्ये ७४७१८ इतकी लोकसंख्या राहात
आहे. त्यांचे प्रश्न हे प्राधान्यक्रमाने विचारात घेतले तर शहरातील इतर प्रश्न मार्गी लागणे सोयीचे ठरते व विषमतेच्या उच्चाटनाबरोबरच
समान जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सामाजिक न्याय, समता, बंधुता अशी मूल्ये खऱ्या अर्थानं
रुजावित यासाठी विशेष प्रयत्न शहरातील झोपडपट्ट्यामध्ये होणे गरजेचे आहे.
एकूण झोपड्यांची संख्या ८९७७
लोकसंख्या७४७१८
क्षेत्रफळ ६७.९६ हे
शौचालये १३००
रस्ते (चौ. फुट) १०२५९८०
पाणी जोडणी २४९
दिव्यांचे खांब ३३६
८९७७ कुटुंबासाठी २४९ नळ जोडणी म्हणजेच…३६ कुटुंबांसाठी १ नळ जोडणी
१०२५९८० चौ. फुटात ३३६ दिव्यांचे खांब म्हणजेच… २८४९९ चौ. फुटात फक्त १ दिव्याचा खांब.
२००३-२००४ मध्ये घोषित झोपड्यांची संख्या : १०००१
अघोषित झोपड्यांची संख्या : ५१८
मात्र झोपड्यांमध्ये एवढी वाढ होऊनही सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही.