प्राणी-वनस्पती
सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.
जैवविविधतेने संपन्न आणि जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या २५ अतिसंवेदनशील (Eco Sensitive) क्षेत्रांपैकी एक असलेल्या पश्चिम घाट परिसरात कोल्हापूर शहर वसलेले आहे. त्यामुळे शहरास जैवविविधतेचासमृद्ध वारसा लाभलेला आहे.
कोल्हापूर शहरात ग्रीन गार्डस् संस्थेने केलेल्या गेल्या १० वर्षातील सर्वेक्षणानुसार २३८ प्रजातींचे पक्षी, ८४ प्रजातींचीफुलपाखरे, १९ प्रजातींचे सस्तन प्राणी, ३३ प्रजातींचे सरीसृप व अन्य अनेक प्रजातींचे उभयचर प्राणी, कीटक, मासे
आढळले आहेत.
परंतू बेसुमार लोकसंख्यावाढ, जमीन वापरातील बदल, अयोग्य उपनगरीय विस्तार, अनियंत्रीत औद्योगिकीकरण, प्रदूषण,
शिकार, वृक्षतोड, जलाशयांचे उच्चाटन, विकृतीकरण इत्यादी कारणांमुळे शहरातील जैवविविधता घटते आहे.
कळंबा तलावाचा ऱ्हास झाल्यास १३ प्रजातींचे स्थलांतरित पक्षी (लडाख, सैबेरियातून येणारे) व ४ प्रजातींचे स्थानिक
पक्षी कोल्हापूर शहरातून नामशेष होतील.
कोल्हापूर शहराची जैवविविधता टिकविण्यासाठी वन्यजीव कायदा, जैवविविधता कायदा, पर्यावरण कायदा, वृक्षअधिनियम
आदींचे कडक व काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे.