बाबू जमाल मशीद
महालक्ष्मी देवालयापासून काही अंतरावर बाबूजमाल दर्गा हा ताराबाई रोडवर लक्ष्मी सरस्वती चित्रमंदिरामागे आहे. हा दर्गा कोल्हापूरात ज्यावेळी सर्व प्रथम मुस्लिम आले त्यावेळी बांधला गेला असावा असा अंदाज आहे.
या दर्ग्यात आत जाताना एक मोठे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार १९०९ साली बांधले गेले असे त्यावर कोरलेल्या मजकुरावरुन समजते. दर्ग्याच्यामध्ये एक छोटी बाग असून जवळपास इतर आवश्यक इमारती आहेत. मुख्य दर्गा मध्यभागी आहे.
हा दर्गा नेहमीच्या मुस्लिम पध्दतीचा असून मध्ये मोठा घुमट व चारी कोपऱ्याला चार लहान घुमट आहेत. येथील वैशिष्ट्य म्हणजे या दर्ग्याच्या चौकटीवर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. हे मुस्लिम दैवत शहरातील सर्व मुस्लिमांचे प्रमुख देवस्थान आहे.