बारा ज्योतिर्लिंग
बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिष्ठापना : देवालयाच्या उत्तरेस १३ ओवऱ्या व पूर्वेस १७ तशाच पश्चिम व दक्षिणेकडे काही ओवऱ्या आहेत. जोतिबाचे उत्तरेस ४ फर्लांगावर परशुरामाची माता यमाईचे देवालय आहे.
रामलिंगाचा परशुरामशी संबंध असल्यामुळे, डोंगरावरील मंदीर आंवारात रामलिंगाचेही छोटे स्थान आहे. यमाईची मूर्ती ही नरम काळया पाषाणाची आहे. हे देवालय इ.स. १७३० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी बांधले. तसेच परशुरामाच्या पित्याचे नावे जामदग्न्य तीर्थही बांधण्यात आले आहे.