ब्रम्हेश्वर मंदिर
ब्रम्हेश्वराचे हे प्राचीन मंदिर वरुणतीर्थ वेशीत जनता बझारच्याजवळ आहे. या मंदिराची रचना महालक्ष्मी मंदिरासारखीच आहे. फक्त याला शिखर नाही व ते विस्ताराने लहान आहे.
मंदिराचा बराचसा म्हणजे निम्म्याहून अधिक भाग पृष्ठभागापासून खाली खोलगट भागात आहे. मंदिराच्या गर्भगृहातील लिंग भूमिगत आहे. मंदिराच्या गर्भगृहासमोर छोटासा मंडप आहे. या प्राचीन मंडपाला लागून आता नव्याने दुसरा मोठा मंडप बांधण्यात आला आहे.