महालक्ष्मीस्तोत्र
महिषमर्दिनी महालक्ष्मी हे
नमितो तुजला जय जय जय
सिंहारोहिणी रणचंडिके
नमितो तुजला जय जय जय —- १
दुर्जनदंडिनी दुर्गामाते
नमितो तुजला जय जय जय
दु:खविमोचिनी मायभवानी
नमितो तुजला जय जय जय —- २
अरिहंत्री तू अंबामाते
नमितो तुजला जय जय जय
भवभयहारिणी भक्तावरदे
नमितो तुजला जय जय जय —- ३
शैलनंदिनी उमामहेश्वरी
नमितो तुजला जय जय जय
मृदुलभाषिणी सुहास्यवरदे
नमितो तुजला जय जय जय —- ४
ज्ञानदायिनी ज्ञानदीपिके
नमितो तुजला जय जय जय
विश्वधारिणी विष्णुपत्नी हे
नमितो तुजला जय जय जय —- ५
– सौ. शुभांगी सु. रानडे