शहरातून तयार होणारे सांडपाणी व मैला

सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.

शहरातून तयार होणारे सांडपाणी व मैला

जयंती नाला : ७४ द.ल.लि. प्रति दिवशी
दुधाळी नाला : १८ द.ल.लि. प्रति दिवशी
लाईन बझार : ५ द.ल.लि. प्रति दिवशी
बापट कँप नाला :७ द.ल.लि. प्रति दिवशी

एकूण १०४ द.ल.लि. प्रति दिवशी इतके सांडपाणी व मैला प्रक्रियेशिवय नदीत मिसळतो. हेच पाणी
जुजबी प्रक्रियेनंतर थेट पिण्यासाठी मिळते.

याशिवाय नद्यांच्या उगमापासून नदीच्या दुतर्फा असणाऱ्या गावांमधून येणारे सांडपाणी, मैला पाण्यात
मिसळतो. त्याचबरोबर शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक खते, औषधे आणि ५ साखर कारखाने – २
डिस्टिलरी आणि इतर उद्योगातून, हॉस्पिटल, चर्मोद्योगातून बाहेर पडणारे सांडपाणी थेट नदीत मिसळते.

शहरातील पंचगंगा घाटावरून ११९ टन इतकी मृतदेहाची राख प्रतीवर्षी नदीत टाकली जाते. तसेच
४५०० सार्वजनिक आणि ४०००० घरगुती गणपतींचे विसर्जन निर्माल्यासह पंचगंगेत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »