शिवाजी विद्यापीठ
कोल्हापूरची ही करवीर नगरी म्हणजे संस्कृतीचे व्यासपीठ अशा या सांस्कृतिक नगरीत शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीने एक नवीन शैक्षणिक व सांस्कृतिक दालन मोठ्या वैभवात उभे केले आहे. १९६३ साली मा. कै. ना. यशवंतरावजी चव्हाण, कै. ना. बाळासाहेब देसाई यांच्या पुढाकाराने या विद्यापीठाची उभारणी झाली. कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्याच्या शैक्षणिक उच्च शिक्षणाचा कारभार या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे.
१००० एकर जमिनीत उभारलेला या विद्यापीठामुळे कोल्हापूरच्या नव्हे तर महाराष्ट्नच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण कामगिरी पार पडली आहे.
मुख्य प्रशासकिय इमारतीशिवाय भव्य बॅरिस्टर खर्डेकर ग्रंथालय, मानवता बिल्डींग, जीवशास्त्र बिल्डींग, सांस्कृतिक सभागृह, विद्यार्थी, विद्यार्थीनींचे स्वतंत्र निवास गृहांची उभारणी मोठ्या कौशल्याने उभी केलेली आहे. या शिवाय भव्य क्रिंडागण आणि पदवीदान समारंभासाठी स्वायत स्वतंत्र खास कक्ष ही उभारणेत आले आहे.
विद्यापीठाचे परिसरात मुख्य प्रशासकिय इमारतीजवळ छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ भव्य पुतळा म्हणजे या विद्यापिठाचे खास वैभव आहे. वृक्षवल्ली, अनेक फुलझाडे, फळझाडे, बगीचा यामुळे हे विद्यापीठ निसर्गरम्य वाटते.
प्रतिवर्षी १ लाख पंचवीस हजार उच्च माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थी सहभागी होतात. तर यासाठी प्रशासन, लेखाविभाग, भांडार, परिक्षा विभाग, नियोजन, अर्थ विभाग या सारखे अनेक विभाग हजारो कर्मचाऱ्यांसह सहभागी असतात.
कुलगुरू, कुलसचिव, प्रा. प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी, गव्हर्नर प्रतिनिधी व इतर अनेक प्रतिनिधी मार्फत या विद्यापीठाचा कार्यभाराचे संयोजन केले जाते.