गणपतराव वडगणेकर हे सुद्धा कोल्हापुरातले एक नावाजलेले चित्रकार. बाबूराव पेंटरांप्रमाणे वडगणेकरही कोणत्या आर्ट स्कूलमध्ये शिकले नाहीत. अगदी साधारण सांपत्तिक परिस्थितीमधून, कुणाचीही फारशी मदत न घेता केवळ स्वत:च्या अवलोकनशक्तीवर विसंबून राहून कलेतील तंत्रविषयक गोष्टींचा इतका अभ्यास करणे फारसे कुणाला जमत नाही. परंतु गणपतरावांनी दुसऱ्यांची चित्रे पाहून चिंतन, मनन, करुन जलरंग चित्रणपध्दतीचा इतका सखोलपणे कसा अभ्यास केला असेल असा विचार पडतो.
Read Moreदत्तोबा दळवी हेही कोल्हापूरातले एक वेळचे प्रसिध्द चित्रकार. बाबूराव पेंटर व त्यांचे बंधू आनंदराव पेंटर यांच्या संगतीने दळवी हे चित्रकलेकडे आकर्षित झाले. कलाशिक्षणाकरिता ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये गेले व तिथे त्यांना त्या काळचे विख्यात कलाशिक्षक तासकर व गणपत केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मिळाले.
Read Moreदुसरे ज्येष्ठ कलाकार बाबूराव पेंटर. रंगछटांचे वजन जराही ढळू न देता सफाईदार रंगेलपन करणे व ते करीत असताना समोरच्या व्यक्तीमधून एक कल्पनारम्य प्रतिमा उभारणे हे त्यांच्या इतके कोणत्याही समकालीन चित्रकाराला जमले नाही.
Read Moreरवींद्र मेस्त्री यांचे चित्र म्हणचे कोल्हापूरकर रसिकांना एक वेगळा अनुभव आहे. कोल्हापुरात वेगवेगळया चित्रकारांनी व्यक्तिेचत्रे रंगविली. बहुतेक चित्रकरांनी केलेल्या व्यक्तिेचत्रात रंगलेपनपध्दती, मांडणी, छायाप्रकाश, क्षेत्रांची विभागणी इत्यादी गोष्टीत एक प्रकारचा संलग्नपणा आढळतो.
Read Moreया पृथ्वीतलावर कोट्यावधी माणसं जन्माला येतात आणि निसर्ग नियमाप्रमाणे काळाच्या ओघात नाहिशी होतात. अशा माणसाच्या आठवणीसुध्दा जगाच्या स्मृतीपटलावरसुध्दा शिल्लक राहत नाहीत.
Read Moreराजर्षी शाहूंच्या ४८ वर्षाच्या आयुष्यात घडलेल्या बहुविध घटनांचा, मग ती घटना अत्यंत क्षुल्लक वाटणारी असो अथवा मोठी असो, मागोवा घेतला तर प्रत्येक घटनेच्या संदर्भाने झालेली कृती जमिनीतून वर येणारा प्रत्येक कोंब नवनिर्मितीच्या प्रेरणा घेऊन जसा बाहेर येतो. त्याप्रमाणे एक नवविचार घेऊन वाटचाल करीत असे असेच आढळून येईल. नवविचारांना कृतीशीलतेतून जन्म देणारा हा राजा खऱ्या अर्थाने कृतीशील विचारवंत होता.
Read Moreराजर्षी शाहू महाराजांनी विषमतेवर पहिला भीमटोला टाकला तो जातीयतेच्या राक्षसाला आव्हान देऊन.गंगाराम कांबळयाच्या हॉटेलात जाऊन स्वत: चहा घेतला आणि राजा जर अस्पृष्यता पाळत नाही तर समाजाने का पाळावी हा संदेश देऊन टाकला. अशा छोट्या छोट्या प्रसंगातून या राजाच्या हिमालयाएवढ्या उंच मनाची कल्पना येते. खरं तर पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे हा माणूस आकाशाएवढा मोठा वाटायला लागतो.
Read Moreशाहू या राजा माणसाने हे पक्केपणाने हेरले आणि आपल्या संस्थानात मन बांधणी करण्याची सुरुवात केली. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा म्हणून सर्वांना शिक्षणाची समान संधी देण्यास त्यांनी अग्रक्रम दिला.
Read Moreआपण नेहमी म्हणतो की आजकालचे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी झाले आहेत व त्यांचे लक्ष विषयांचे ज्ञान मिळविण्याऎवजी परिक्षेत जास्त मार्क कसे मिळतील याकडे असते. त्यामुळेच क्रमिक पुस्तके व पुरवणी साहित्य न वाचता गाईड वापरण्याकडे त्यांचा कल असतो.
Read More