कणेरी मठ

कोल्हापूरापासून फक्त १ मैलावर कणेरी हे एक छोटेसे गाव आहे. करवीर तालुक्यातील या गावात एक निसर्गरम्य उंच टेकडी असून तेथे प्राचीन काळी भगवान शंकराची स्थापना झाल्याचे इतिहास सांगतो. २ मैलाचा हा परिसर अत्यंत रमणीय आणि नैसर्गिक असा आहे. साधारणपणे १४ व्या शतकाच्या सुरूवातीला या परिसरात शंकराच्या पिंडीची स्थापना लिंगायत समाजातील धर्मगुरूंनी केली असावी असे बोलले जाते.

Read More

जैन स्वामी मठ

हा मठ शुक्रवार पेठेत असून गंगावेशपासून थोड्याच अंतरावर आहे. या प्राचीन मठाचे प्रवेशव्दार (नगारखाना) जुन्या राजवाड्याच्या नगारखान्यासारखाच असून अतिभव्य व आकर्षक राजवाड्याच्या नगारखान्यासारखा असून अतिभव्य व आकर्षक आहे. या नगारखान्याच्या मोठ्या खांबावर आधारित मनोरे आहेत.

Read More

दख्खनचा राजा श्री जोतिबा

दक्षिण काशी म्हणून भारतभर ख्यातकीर्द असलेल्या करवीरपीठास धर्मशास्त्रात अनन्य साधारण महत्व आहे. दख्खनचा राजा श्री जोतिबा, श्री कात्यायनी देवी, नृसिंहवाडी येथील श्रीक्षेत्र दत्तात्रय मंदीर, बाहुबली येथील जैन धर्मियांचे पवित्र क्षेत्र, त्याचप्रमाणे विशाळगड दर्गा आदि धर्मस्थळांमुळे कोल्हापूरचा लोकिक त्रिखंडात झाला आहे.

Read More

जैन तीर्थक्षेत्र बाहुबली

जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील बाहुबली (कुंभोज) हे स्थान शतकापासून प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या तालुक्याच्या उत्तरेस सात कि.मी. अंतरावर हे स्थान वसले आहे. बाहुबलीस येण्यासाठी विविध मार्ग आहेत.

Read More

बारा ज्योतिर्लिंग

बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिष्ठापना : देवालयाच्या उत्तरेस १३ ओवऱ्या व पूर्वेस १७ तशाच पश्चिम व दक्षिणेकडे काही ओवऱ्या आहेत. जोतिबाचे उत्तरेस ४ फर्लांगावर परशुरामाची माता यमाईचे देवालय आहे.

Read More

खिद्रापूर

कोल्हापूर जिल्ह्याला भेट देणारे पर्यटक दक्षिण काशी कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदीर, महाराष्ट्नचे लोकदैवत श्री जोतिबा, निसर्गरम्य पन्हाळा विशाळगड, दाजीपूरचे अभयारण्य इत्यादी प्रसिध्द पावलेल्या स्थळांना भेटी देत असतात.

Read More

रामलिंग परिसर

कोल्हापूर जिल्ह्यातील धुळेश्वर व रामलिंग ही प्राचीन धार्मिक स्थळे प्रसिध्द आहेत. भाविकांचे श्रध्दास्थान असलेली ही स्थळे हल्ली पर्यटकांचीही आकर्षणे बनली आहेत. या रमणीय परिसराची माहिती . . .

Read More

श्री क्षेत्र नृसिंहवाडी

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे. नृसिंहवाडी म्हणजे दत्तसंप्रदायची राजधानीच. कोल्हापूरपासून सुमारे ४५ कि.मी. अंतरावर कृष्णा आणि पंचगंगेच्या पावन संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे. कोल्हापूरहून जयसिंगपूरमार्गे नृसिंहवाडीस जाता येते.

Read More

किल्ले भुदरगड

भुदरगड हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला, कोल्हापूरच्या दक्षिणेस ३६ मैलावर व गारगोटीपासून ५ मैलावर सह्याद्रीच्या ऐन मध्यावरील उभट खडकावर विराजमान झाला आहे. प्रलयंकर शंकराच्या जटेत चंद्रकोर शोभावी तसा! याची दक्षिणोत्तर लांबी २६०० फूट असून रूंदी २१०० फूट आहे.

Read More

किल्ले पन्हाळा

कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि शहराच्या वायव्येस असणारा पन्हाळा हा किल्ला शिव छत्रपतींचा आणि संभाजीराजांचा आवडता किल्ला. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्ययनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या अनेक आठवणी इथे या किल्ल्याच्या छायेत वावरताना येतात.

Read More
Translate »