कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडाच्या पूर्वेला ९ ते १० कि.मी. अंतरावर गजापूर, पांढरपाणी व येळवण जुगाईच्या मध्यावर उंची ठिकाणी म्हणजे १७११ फुटावर पावनखिंड आहे. पावनखिंड ज्या दोन डोंगरांच्या दरीत येते ती दरी दक्षिणोत्तर असून सात मैल लांबीची आहे. या दरीतच कासारी नदी उगम पावली आहे. पन्हाळा, म्हाळुंगे, पांडवदरी, धनगरवाडा, पांढरपाणी, घोडखिंड असा हा मार्ग आहे.
Read Moreसृष्टीच्या सामर्थ्याचे शिखर आणि मानवी करामतीचा कळस म्हणजेच बुलंद बाका किल्ले रांगणा. किल्ल्यात रांगडा किल्ले रांगणाच. त्याचे अक्राळ विक्राळ रूप शतकानुशतके कायम आहे. रांगण्याच्या रचनेला नेमके हे स्थान कुणी आणि केव्हा हेरले असावे याचा विचार न करताच त्याची उपयुक्तता ओळखणारा दर्दी माणूस पल्लेदार दृष्टीचा असला पाहिजे हे मनाला पटते. आजच्या सुधारलेल्या साधनाच्या सहाय्याने रांगणाच्या परिसरात प्रवेश करणे म्हणजे एक दिव्य आहे.
Read Moreइथेच पडिला बांध खिंडिला बाजीप्रभुच्या छातीचा
इथेच फुटली छाती, परी ना दिमाख हरला जातीचा ।
आठवण येता अजून येतो, खिंडीचा दाटून गळा ।
विशाळगडाच्या विशाल भाळी, रक्तचंदनी खुले टिळा ।।
दसरा चौकातून शहराच्या उत्तरेकडील भागात तीन कि. मी. अंतरावर नवा राजवाडा मोठ्या डौलाने उभा आहे. या राजवाड्याचा नकाशा मेजर मँट या वास्तुशिल्पकाराने बनविला आहे. आणि तो तयार होण्यास सन १८७७ ते १८८४ असा सात वर्षाचा कालावधी लागला.
Read Moreशहराच्या मध्यवस्तीत व महालक्ष्मी देवालयाच्या सान्निध्यात असलेला हा राजवाडा सुमारे अडीचशे वर्षापूर्वी बांधला गेला. त्यानंतर अनेकवेळा त्यात सुधारणा केल्या गेल्या. सन १८१३ मध्ये त्याचा काही भाग पुन्हा बांधण्यात आला.
Read Moreरम्य सायंकाळी रंकाळा तलावाशेजारील हा राजवाडा ! नयनरम्य निसर्गपरिसर पाहून भान हरपावे आणि या राजवाड्याची रंकाळा तलावात पडलेली छाया पाहून यमुनेत छाया पडलेल्या ताजमहलची आठवण व्हावी असा हा आकर्षक वाडा म्हणजे शालिनी पॅलेस होय.
Read Moreही छोटी टुमदार इमारत १८७६ साली बांधली गेली. इमारतीच्या मध्यभागी एक गॅलरी असलेले सभागृह असून दोन्ही बाजूस खोल्या आहेत. समोर व्हरांडा आहे. या इमारतीचा उपयोग संस्थानकाळात कार्यालयासाठी व इतर कामासाठी केला जात असे.
Read Moreकोल्हापूरवासियांच्या फिरण्याचे व हवा खाण्याचे प्रमुख ठिकाण म्हणजेच रंकाळा तलाव होय. रंक भैरव हे शिवाचे रुप आणि या नावावरुनच याला रंकाळा हे नाव पडले आहे. पूर्वी येथे एक दगडाची खाण होती. या खाणीतील दगडांचा उपयोग शहरातील काही जैन व हिंदू मंदिरांसाठी केला गेला.
Read Moreकोल्हापूर हे शहर कुस्ती या खेळाबद्दल अखिल भारतात प्रसिध्द आहे. श्री. शाहू खासबाग मैदान हे या पेशातील लोकांचे मानाचे स्थान आहे. या खासबाग कुस्ती मैदानात आजपर्यंत अगणित लहान मोठ्या कुस्त्या खेळल्या गेल्या, असंख्य पैलवान या मातीत नावारुपाला आले आणि या मैदानाने करोडो लोकांच्या डोळयांचे पारणे फेडले.
Read More