शहराच्या वायव्येस पंचगंगा नदीकाठी एक मोठा घाट बांधलेला आहे. या घाटाच्या सभोवताली व प्रत्यक्ष नदीमध्ये अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. राजघराण्यातील व्यक्तींचे अंत्यविधी इथे केले जात असल्यामुळे येथील बरीच मंदिरे राजघराण्यांच्या व्यक्तींच्या नावे वाहिलेली आहेत.
Read Moreसध्या कोल्हापूरात असलेले हे नाट्यगृह सुमारे ९० वर्षापासून उभे आहे. महाराष्ट्नतील हे सर्वात जुने नाट्यगृह होय. या नाट्यगृहाची उभारणी राजर्षी छ. शाहू महाराजांच्या प्रेरणेने झाली.
Read Moreकोल्हापूरची ही करवीर नगरी म्हणजे संस्कृतीचे व्यासपीठ अशा या सांस्कृतिक नगरीत शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीने एक नवीन शैक्षणिक व सांस्कृतिक दालन मोठ्या वैभवात उभे केले आहे. १९६३ साली मा. कै. ना. यशवंतरावजी चव्हाण, कै. ना. बाळासाहेब देसाई यांच्या पुढाकाराने या विद्यापीठाची उभारणी झाली. कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्याच्या शैक्षणिक उच्च शिक्षणाचा कारभार या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे.
Read Moreकरवीर नगरी ही कलानगरी म्हणूनच प्रसिद्ध आहे. या नगरीचे एक सुपूत्र म्हणजे मांडरे बंधू. चंद्रकांत मांडरे आणि सूर्यकांत मांडरे या बंधूनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक वेगळा ठसा उमटविला.
Read Moreवाड्यातील छत्रपती शहाजी महाराजांची ख्याती इतिहासप्रेमी रसिक, वाचक, पर्यटक इतिहास भवन अशी होती. कोल्हापूरचे श्रद्धास्थान म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त सन १९७४ दि. ३० जून रोजी श्रीमंत शहाजीराजानी आपल्या संग्रहातील अनेक दुर्मिळ मौल्यवान वस्तूंचा संग्रह एकत्रित करून स्वतंत्र असे संग्रहालय उभा केले.
Read Moreदाजीपूर एक छोटसं, इवलसं नांव परंतु या दाजीपुरात रम्य, दाट कीर्द झाडी, वृक्ष-वल्ली, शेकडो नमुन्याचे प्राणी आणि पक्षी पाहिले की, या अरण्यात नित्य व्यवहारातील सर्व औपचारीक दैनंदिन व्यवहार विसरून निसर्गाच्या कुशीत लपलेला एका छोट्या मुलासारखी माया मिळते हे या गावाचे वैशिष्ट.
Read Moreकागल तालुक्यातील पश्चिमेस सुमारे चार-हजार लोकसंख्या असलेल्या मळगे बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची देवाची यात्रा … त्यानिमित्त या देवस्थानाविषयी..
Read Moreकोल्हापुरच्या दक्षिणेला 15 कि.मी. अंतरावर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीजवळ असलेला कन्हेरी गावाच्या टेकडीवर असलेला लिंगायत धर्मीयांचा प्राचीन सिद्धगिरीमठ प्रसिद्ध आहे.
Read Moreमहावीर वाणीलक्ष्मीसेन ग्रंथालयात अनेक प्राचीन ग्रंथ आहेत. 400 ताडपत्रीवर, तर 410 कागदावर लिहिलेले हस्तलिखित ग्रंथ आहेत.
Read Moreकोल्हापूर शहरातील ही गॉथिक शैलीत बांधलेली अत्यंत सुंदर वास्तू असून तिला दोन मनोरे आणि अत्यंत निमुळते छप्पर आहे. येथे 500 माणसे एकावेळेला बसू शकतील असे प्रशस्त सभागृह असून सभागृहाच्या दोन्ही बाजूस दोन-दोन खोल्या, प्रशस्त व्हरांडय़ाने जोडलेल्या आहेत.
Read More