कोल्हापूरच्या श्रीमंत छत्रपतींचे हे निवासस्थान ‘नवा राजवाडा’ म्हणून विख्यात आहे. शहराच्या उत्तरेस कसबा बावडय़ाच्या रोडवर रम्य वनश्रीच्या सानिध्यात कित्येक एकराच्या विस्तृत परिसरात पसरलेला हा राजवाडा म्हणजे कोल्हापूरचे आकर्षण आहे.
Read Moreपर्यटकांचे व कोल्हापुरकरांचे आवडते ठिकाण म्हणजे रंकाळा तलाव रंकाळा चौपाटी. या रंकाळा तलावाच्या पश्चिम काठावर 1931 ते 1934 च्या कालखंडात शालिनी राजेंच्या नावाने बांधलेला भव्य व देखणा राजवाडा म्हणजे शालिनी पॅलेस. मुळातच हा परिसर रमणीय आहे.
Read Moreमहालक्ष्मी मंदिरापासून काही अंतरावर ताराबाई रस्त्यावर असलेल्या पार्किगच्या जागेजवळ हा कोल्हापुरातील प्रसिद्ध दर्गा आहे. या दग्र्याचे बांधकाम कोल्हापुरात जेंव्हा प्रथम मुस्लीम आले त्या काळात झाल्याचा अंदाज आहे.
Read Moreकेशवराव भोसले नाटय़गृहाजवळील कैलासगडची स्वारी हे शिवमंदीर दक्षिण काशी कोल्हापूर येथील एक जागृत व भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून प्रसिध्द आहे.
Read Moreकोल्हापूर : जैन संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक लक्ष्मीसेन मठाने दोन हजार वर्षाची परंपरा जोपासली आहे. शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन महास्वामींच्या मठातील आदिनाथ तीर्थकरांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा सुवर्णमहोत्सव वर्षभर विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. अशा मठाला दोन हजार वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे.
Read Moreश्रद्धाळू भारतीय मनाची परिसीमा म्हणजे काशी दर्शन, प्रयाग येथील त्रिवेणी संगम व गया येथील पिंडदान. पण करवीरच्या यात्रेकरूंना इतके कष्ट करण्याची काहीच गरज नाही. कारण ही तीनही क्षेत्रे कोल्हापुरातच आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात काशी यात्रेपेक्षाही या ‘दक्षिण काशी’चे महत्त्व अधिक मानतात.
Read Moreशाहू महाराजांच्या काळात घडलेल्या वेदोक्त प्रकणामुळे ब्राह्मणेत्तरांना वेदोक्त पद्धतीने धर्मविधी करण्याचे ज्ञान देण्यासाठी राजर्षी शाहूंनी 6 जुलै, 1920 ला वरील वैदिक शाळा बिंदू चौकाजवळ सुरू केली.
Read Moreवरुणतीथाजवळील फिरंगाई देवीचे मंदिर असून हे बहुजन समाजाचे दैवत मानले जाते. फिरंगाईस प्रत्यागिरादेवी म्हणूनही ओळखले जाते. भाविक लोक देवीला पीठ, मीठ, हळद आणि तेल अर्पण करतात. पूर्वीच्या काळी देवीसमोर रेडय़ाचा बळी दिला जात असे.
Read Moreशुक्रवार पेठेत पंचगंगा नदीच्या घाटावर जाण्याच्या मार्गावर हा तेराव्या शतकातील प्राचीन शंकराचार्य मठ आहे. हा मठ दुमजली असून त्याच्या बांधणीमध्ये भव्यता किंवा कलाकुसर आढळून येत नाही.
Read Moreब्रम्हेश्वराचे हे प्राचीन मंदिर वरुणतीर्थ वेशीत जनता बझारच्याजवळ आहे. या मंदिराची रचना महालक्ष्मी मंदिरासारखीच आहे. फक्त याला शिखर नाही व ते विस्ताराने लहान आहे.
Read More