पर्यटन : विषयवार वर्गवारी हवी

सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.

कोल्हापूर आणि पर्यटन असा एक दृढ संबंध सतत चर्चेत असतो. अंबाबाई मंदीर, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, शिवाजी विद्यापीठ अशी चार ठिकाणे आणि त्याच्या जोडीला पन्हाळा-जोतिबा अशी पर्यटनाची चौकट ठरून गेली आहे. चार लोक गावात आले की, त्यांचे चहा-पाणी-जेवण-राहाणे या बाबी आल्याच. ही सगळी उठाठेव एखाद्या दिवसाची असते. अनेकदा सकाळी येऊन संध्याकाळी परत जाण्याचे नियोजन लोक करताना दिसतात. चार हॉटेल्स चालली की, पर्यटन व्यवसाय वाढीला लागला असे म्हणून चालणार नाही. खऱ्या अर्थाने कोल्हापुरातील पर्यटनाशी निगडित व्यवसाय वाढण्यासाठी स्थानिक पर्यटक, बाहेरील पर्यटक व परदेशी पर्यटक अशी वर्गवारी विचारात घेऊन कोल्हापुरात पहाण्यासारखे काय-काय आहे हे ठरवले पाहिजे आणि दाखवले पाहिजे. यासाठी ते जपले पाहिजे ही महत्त्वाची बाब आहे आणि जपताना त्या वास्तू किंवा परिसराचे पर्यावरणाशी नाते तुटण्याऐवजी अधिक घट्ट झाले पाहिजे.

पर्यटन ठिकाणे : ऐतिहासिक पर्यटन स्थळे: जुना राजवाडा, नवा राजवाडा, धुण्याच्या चाव्या रंकाळा, शालिनी पॅलेस, बिंदू चौक तटबंदी, साठमारी, राजर्षि शाहू जन्मस्थान धार्मिक पर्यटन स्थळे : अंबाबाई मंदीर, विठ्ठल मंदीर, खोलखंडोबा मंदीर, टेंबलाई मंदीर, जैन मठ, कैलासगडची स्वारी, चर्च (मुख्य पोस्टऑफीससमोर), ब्रह्मपुरी मशिद, श्री पद्मावती मंदीर, श्रीमद्जगतगुरू शंकराचार्य मठ,

निसर्ग पर्यटन स्थळे : रकाळा – कळंबा – कोटीतीर्थ तलाव, कात्यायनी, टाऊन हॉल, पंचगंगा घाट, पंचगंगा घाट-क ।। बावडा

संग्रहालये : नवा राजवाडा, टाऊन हॉल, मांडरे कलादालन, वि. स. खांडेकर दालन (शिवाजी विद्यापीठ)

इतर : गुऱ्हाळ, कुस्ती मैदान/आखाडा, छ. शाहू स्टेडियम, छ.शिवाजी स्टेडियम, केशवराव भोसले नाट्यगृह,

दूधकट्टा, जयप्रभा स्टुडिओ, पाण्याचा खजिना, शालिनी सिनेटोन, मर्दानी खेळ, शिवाजी विद्यापीठ व्यवसाय पर्यटन : गुजरी, चांभार ओळ, मार्केट यार्ड व सर्व औद्योगिक क्षेत्रे पुतळे : छ. ताराराणी पुतळा, छ. राजाराम महाराज, छ. शाहू महाराज (दसरा चौक), प्रिन्स शिवाजी, चिमासाहेब

महाराज पुतळा, म. गांधी पुतळा (साईक्स बिल्डींग), म. गांधी पुतळा (पापाची तिकटी), म. गांधी पुतळा (गांधीमैदान), पै.अल्लादिया खाँसाहेब, आईसाहेब महाराज, छ. संभाजीमहाराज पुतळा, छ. शिवाजी महाराज पुतळा (शिवाजी चौक), शिवाजी महाराज पुतळा (शिवाजी विद्यापीठ), आंबेडकर पुतळा (मनपा), आंबेडकर पुतळा (बिंदू चौक), म. फुले पुतळा (बिंदू चौक), वि. सं. खांडेकर, ताराराणी पुतळा (ताराराणी विद्यापीठ), राजमाता जिजाबाई पुतळा (के.एम.सी. कॉलेज), अर्धा शिवाजी पुतळा, छ. शाहू पुतळा (मार्केट यार्ड), आईचा पुतळा, कर्मवीर भाऊराव पाटील, ( एस. टी. स्टँड व शिवाजी विद्यापीठ), पै. आबालाल रहेमान व कै. बाबूराव पेंटर पुतळा (पद्मा गार्डन),

स्तंभ : मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, टाऊन हॉल बाग स्तंभ, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, हुतात्मा उद्यान, ऑलिंपिक किर्तीस्तंभ, रेड्याची टक्कर. खाद्यपदार्थ : मिसळ, मांसाहारी जेवण, झुणका भाकर, गूळ, ग्रामीण शाकाहारी जेवण, भेळ, उसाचा रस, आईस्क्रिम जतन ऐतिहासिक वास्तूंचे

कोलापूर, कोल्लापूर, करवीर, कोल्हापूर ही आहेत कोल्हापूरची प्राचीनकाळापासून आजपर्यंत कालानुरूप बदलत गेेलेलीनावे. प्राचीन काळापासून अनेक राजवटींच्या राजधानीचा मानही कोल्हापुरास मिळालेला आहे. ब्रह्मपुरी टेकडीच्या उत्खननातून पुरातन कोल्हापूरवरही प्रकाशझोत पडला आहे. तथापि, पुरातत्त्वदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्याही अनेक महत्त्वाच्या वास्तु, स्मारके तसेच शिलालेख कोल्हापूर शहराच्या परिसरात असूनही त्यांची योग्य देखभाल होत नाही. परिणामी हळूहळू हा इतिहासच पुसला जात आहे. या वास्तूंचे, स्मारकांचे, व शिलालेखांचे योग्य पद्धतीने जतन करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »