वाहतूक व्यवस्थापन

सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.

सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या ४९३१६७ (जनगणना२००१) इतकी आहे. त्यामुळे वाहनांचे वाढते प्रमाण दिसू लागले आहे. शिवाय बाहेरून येणारे पर्यटक व हद्दीलगतच्या गावातून येणाऱ्या लोकांची वाहने हे प्रमाण मोठे आहे. उपलब्ध रस्ते, अंतर, शहराचे क्षेत्रफळ, वाहनथांबे याबरोबर तुलना केली असता वाहनांचे हे प्रमाण जास्त आहे.

शहरामध्ये सार्वजनिक वाहनांची संख्या, नियमितता, जाळे अपुरे व चुकीचे असल्यामुळे एकूण यंत्रणेवर ताण येतो. परिणामी वाहनांमुळे होणारे अपघात, गर्दी, खोळंबा, ध्वनी व वायू प्रदूषण, जलप्रदूषण अशा सर्वच बाबी गंभीर होतात म्हणूनच या सर्व मुद्यांचा गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे. त्यामध्ये रस्ते, वाहन थांबे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिक्षा व इतर खाजगी वाहनांची वाहतूक व्यवस्था, फेरीवाल्यांसाठीचे थांबे, अडथळे आदी मुद्यांचा विचार होणे आवश्यक आहे.

शहरातील वाहतूक बेटे : ३६

जिल्ह्यातील वाहनांची संख्या: १९८७ – ८६४६६ १९९७ – २०३५३६ २००७ – ५१२३९४

कोल्हापूर शहरात घडलेल्या अपघातांचा तपशील :

वर्ष २००१ २००२ २००३ २००४ २००५ अपघात २०५ २७६ २८७ २७३ २०९ प्राणघातक २२ ३२ २८ १८ २४

शहरातील स्वयंचलित सिग्नल : संख्या १८

रंकाळा टॉवर, गंगावेश, माळकर चौक, महापालिका, स्वयंभू गणपती, बिंदू चौक, उमा टॉकीज, पार्वती टॉकीज, जनता बझार, टाकाळा चौक, लिशा हॉटेल, दुर्गा हॉटेल चौक, पंचशील हॉटेल चौक, दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, कोंडा ओळ चौक, फोर्ड कॉर्नर, टाऊन हॉल.

अपेक्षित : संभाजीनगर अतिरहदारीचे रस्ते :

स्टेशन रोड, ताराराणी चौक, रेल्वे फाटक, एस. टी. स्टँड, रंकाळा स्टँड, ताराबाई रोड, महाव्दार रोड, फॅशन कॉर्नर, एम. एल. जी. कॉर्नर, भवानी मंडप, जोतिबा रोड, शिवाजी चौक, गुजरी कॉर्नर, सुभाष रोड, मिरजकर तिकटी, आईचा पुतळा, धान्य ओळ, एस. टी. स्टँड महादेव मंदीर, दाभोळकर चौक, बिंदू चौक, सी.पी.आर., संभाजीनगर.

शहरातील पदपथाची लांबी / रस्ते

एकही नाही – शहरात काही ठिकाणी पूर्वी पदपथ होते पण त्यांचे अस्तित्व आज जवळपास संपुष्टात आले आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व बाबी वाहतूक व्यवस्थापनात विचारात घ्याव्या लागतील. वाहन थांब्याची जागा, बस व रिक्षा थांबे, फेरीवाले, शहरातील मिरवणूक-उत्सव अशा बाबींचाही वाहतुक परिणाम व्यवस्थापनावर होतो. पदपथ नसल्याने रस्त्यावरून एकाच वेळी तीन-चार लोक एकत्र चालणे, ओव्हरटेक करणे, सार्वजनिक रस्त्यावर जनावरांचा मुक्त वावर अशा अनेक मुद्यांचा विचार होणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »