जैव वैद्यकीय घनकचरा व प्लॅस्टिक- थर्माकॉल

सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.

कोल्हापुरात ९२० हॉस्पिटल्स असून ४६३ हॉस्पिटलच्या संचालक डॉक्टरांनी अद्याप जैव वैद्यकीय कचऱ्याच्या
प्रक्रियेसाठी मंडळाकडे आपली नोंद केलेलीच नाही.

टाळायला हवा प्लॅस्टिक व थर्माकॉलचा वापर

शहरामध्ये तयार होणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण सध्या प्रति दिवस वाढत आहे.या कचऱ्यामध्ये देखील प्लॅस्टिक व थर्माकॉलच्या बाजारमालाच्या वेष्टनांचे प्रमाण अधिक आहे, कारण गेल्या दोन दशकात प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी छोट्यातली छोटी वस्तू प्लॅस्टिकमध्ये उपलब्ध आहे.

थर्माकॉल हा पॉलिस्टिरीन पासून तयार होणारा पदार्थ असून तो वेष्टने आणि सजावटीसाठी वापरला जातो. आज वेष्टनासाठी तसेच विविध प्रकारच्या आरास, सजावटीसाठी थर्माकॉलचा सर्रास वापर केला जातो. बदलत्या राहणीमानाच्या वापरा व टाका या नवीन तत्त्वानुसार कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे आणि त्यातही प्लॅस्टिक व थर्माकॉलचे प्रमाण अधिक आहे. या दोन्ही पदार्थांचे विघटन होत नाही. त्यामुळे वापरानंतर या घटकांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न तयार होत आहे. कचऱ्यात / कोंडाळयात खराब अन्नपदार्थ प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून टाकला जातो. अशा पिशव्या भटकी जनावरे खातात. वेष्टने, प्लॅस्टिकच्या डिश, पिशव्या वापरून इतरत्र कोठेही टाकल्या जातात. तसेच गटारामध्ये, नाल्यांमध्ये असे घटक अडकून पुरासारख्या आपत्तीच्या काळात पाणी वाहून जाताना अडचणी निर्माण होतात. काही ठिकाणी असा कचरा जाळला जातो, त्यातून प्रदूषण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »