श्री शिवाजी क्षेत्रिय वैदिक शाळा
शाहू महाराजांच्या काळात घडलेल्या वेदोक्त प्रकणामुळे ब्राह्मणेत्तरांना वेदोक्त पद्धतीने धर्मविधी करण्याचे ज्ञान देण्यासाठी राजर्षी शाहूंनी 6 जुलै, 1920 ला वरील वैदिक शाळा बिंदू चौकाजवळ सुरू केली.
वैदोक्त प्रकरणानंतर ब्राह्मण पुरोहितांचे वर्चस्व नाहीसे करण्यासाठी छत्रपती शाहूंनी उचललेले ते ऐतिहासिक पाउल होते. आजही ही वैदिक पाठशाळा सुरू आहे. पण शहरातील या मोक्याच्या जागेवर आता व्यावसायिक बांधकाम होणार असून त्यानंतरही ही वैदिक शाळा या नव्या इमारतीत
सुरू राहणार आहे. जिज्ञासूंना ही ऐतिहासिक महत्त्वाची वैदिक शाळा पाहण्यास आनंद वाटेल.