पंचगंगा घाट
शहराच्या वायव्येस पंचगंगा नदीकाठी एक मोठा घाट बांधलेला आहे. या घाटाच्या सभोवताली व प्रत्यक्ष नदीमध्ये अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. राजघराण्यातील व्यक्तींचे अंत्यविधी इथे केले जात असल्यामुळे येथील बरीच मंदिरे राजघराण्यांच्या व्यक्तींच्या नावे वाहिलेली आहेत.
संभाजी, तिसरे शिवाजी, आबासाहेब, बाबासाहेब इत्यादी. यापैकी सर्वात मोठे व सुंदर देवालय श्री छत्रपती तिसरे शिवाजी यांचे आहे. हे देवालय सन १८८५ साली बांधण्यात आले.
पंचगंगा घाट संपूर्ण दगडी बांधकामाचा असून खूप मोठा आहे. हा घाट म्हणजे एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. याच्या उत्तरेस मोठ्या कमानी असलेला शिवाजी पूल आहे. हा घाट व जवळील ब्रम्हपुरी टेकडी म्हणजे कोल्हापूर शहराच्या अतिप्राचीन पहिल्या वसाहतीचा भाग होय.