रवींद्र मेस्त्री

रवींद्र मेस्त्री यांचे चित्र म्हणचे कोल्हापूरकर रसिकांना एक वेगळा अनुभव आहे. कोल्हापुरात वेगवेगळया चित्रकारांनी व्यक्तिेचत्रे रंगविली. बहुतेक चित्रकरांनी केलेल्या व्यक्तिेचत्रात रंगलेपनपध्दती, मांडणी, छायाप्रकाश, क्षेत्रांची विभागणी इत्यादी गोष्टीत एक प्रकारचा संलग्नपणा आढळतो.

एक विशिष्ट तऱ्हेची परंपरा मागे असल्यासारखी वाटते व तिचा उगम इंग्रजी चित्रपध्दतीत झाल्याची खात्री पटते. पण रवींद्र मेस्त्री यांचे चित्र पाहताच वस्तूंच्या मांडणीबद्दल, रंगलेपनाबद्दल व प्रकाशयोजनेबद्दलही एक वेगळा अनुभव येऊ लागतो. याचे मुख्य कारण असे की, त्यांच्या या चित्रपध्दतीचा उगम फ्रेंच दृक् प्रत्ययवादी चित्रपध्दतीशी अधिक जुळता आहे.

रवींद्र मेस्त्री यांना चित्रक लेचे बाळकडू घरातच मिळत गेले . लहान वयातच त्यांनी आपल्या चित्रांना बक्षिसे मिळविली व सर्वांनी त्याची वाहवा केली. परंतु ते १९४७ साली जेव्हा जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले तेव्हा आपल्या चित्रातील असलेला कोल्हापुरीपणा त्यांना जाणवला. कलाविश्व फार अफाट आहे आणि आपण ज्याला ग्रेट म्हणतो त्या गोष्टी इतर देशात मासिकातील इलस्ट्न्ेटर्स करुन दाखवतात, हे त्यांना ज्यावेळी समजले तेव्हा त्यांची दृष्टी बदलू लागली. भोसले, धोपेश्वरकरांसारख्या गुरुंनी त्यांचा जणू कायापालटच केला व त्यांना एक नवी दृष्टी प्राप्त करुन दिली.

स्वत:च्या कर्तृत्वशक्तीचा व निग्रहीपणाचा अचूक अंदाज असणारे जे थोडे कलावंत असतील त्यापैकी रवींद्र मेस्त्री हे एक आहेत. बाबुराव पेंटरांचे अनेक गुण यांच्यात दिसून येतात. अनेक गोष्टी यांना अवगत असत व अनेक गोष्टीत ते रस घेत. त्यांच्या चित्रामधून जे सौंदर्य प्रगट होत होते ते जगण्यामधूनही दिसत असे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »