आबालाल रहिमान

आबालाल रहिमान हे सर्वात ज्येष्ठ चित्रकार. त्यांचा कलानिर्मितीचा कालही सर्वात जुना. १८८० मध्ये ते मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी होते. १८८८ पर्यंत ते मुंबईत होते. त्या काळात त्यांनी अहर्निश काम करुन कलासाधना केली व त्या साधनेच्या जोरावरच मरेपर्यंत म्हणजे सन १९३१ पर्यंत अव्याहतपणे कलानिर्मिती केली.

Read More

गणपतराव वडगणेकर

गणपतराव वडगणेकर हे सुद्धा कोल्हापुरातले एक नावाजलेले चित्रकार. बाबूराव पेंटरांप्रमाणे वडगणेकरही कोणत्या आर्ट स्कूलमध्ये शिकले नाहीत. अगदी साधारण सांपत्तिक परिस्थितीमधून, कुणाचीही फारशी मदत न घेता केवळ स्वत:च्या अवलोकनशक्तीवर विसंबून राहून कलेतील तंत्रविषयक गोष्टींचा इतका अभ्यास करणे फारसे कुणाला जमत नाही. परंतु गणपतरावांनी दुसऱ्यांची चित्रे पाहून चिंतन, मनन, करुन जलरंग चित्रणपध्दतीचा इतका सखोलपणे कसा अभ्यास केला असेल असा विचार पडतो.

Read More

दत्तोबा दळवी

दत्तोबा दळवी हेही कोल्हापूरातले एक वेळचे प्रसिध्द चित्रकार. बाबूराव पेंटर व त्यांचे बंधू आनंदराव पेंटर यांच्या संगतीने दळवी हे चित्रकलेकडे आकर्षित झाले. कलाशिक्षणाकरिता ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये गेले व तिथे त्यांना त्या काळचे विख्यात कलाशिक्षक तासकर व गणपत केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मिळाले.

Read More

बाबूराव पेंटर

दुसरे ज्येष्ठ कलाकार बाबूराव पेंटर. रंगछटांचे वजन जराही ढळू न देता सफाईदार रंगेलपन करणे व ते करीत असताना समोरच्या व्यक्तीमधून एक कल्पनारम्य प्रतिमा उभारणे हे त्यांच्या इतके कोणत्याही समकालीन चित्रकाराला जमले नाही.

Read More

रवींद्र मेस्त्री

रवींद्र मेस्त्री यांचे चित्र म्हणचे कोल्हापूरकर रसिकांना एक वेगळा अनुभव आहे. कोल्हापुरात वेगवेगळया चित्रकारांनी व्यक्तिेचत्रे रंगविली. बहुतेक चित्रकरांनी केलेल्या व्यक्तिेचत्रात रंगलेपनपध्दती, मांडणी, छायाप्रकाश, क्षेत्रांची विभागणी इत्यादी गोष्टीत एक प्रकारचा संलग्नपणा आढळतो.

Read More
Translate »