एखादे शहर ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक वा राजकीय क्षेत्रामध्ये प्रगत व उन्नत होते त्यावेळी त्या शहराची सुरुवात व इतिहास जाणून घेण्याची जिज्ञासा नागरिकांना व प्रवाशांना न वाटली तर नवल ! प्रत्येकाला आपल्या शहराच्या पूर्वेतिहासाबद्दल औत्सुक्य असते परंतु ज्ञान असतेच असे नाही. कारण शहराचा इतिहास व ऐतिहासिक घटना एकत्रित केलेल्या फार पिचतच आढळतात. म्हणून या ठिकाणी कोल्हापूर शहराचा इतिहास थोडक्यात फार खोलात न जाता दिलेला आहे.
Read Moreप्राचीन कोल्हापूर
कोल्हापूर शहराची प्रथम वसाहत पंचगंगा (अर्वाचीन कालातील नाव) नदीच्या काठावर एका टेकडीवर वसविली गेली. ही टेकडी म्हणजेच ब्रह्मपुरी होय. या जागेची निवड पाण्याची सोय, शेती त्याचबरोबर शत्रूच्या चालीची टेहाळणी करता यावी या तिन्ही उद्देशाने केलेली होती. पुराच्या पाण्यापासून संरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा ही वसाहत टेकडीवर वसविताना त्यांनी विचारात घेतलेला दिसतो. ब्रह्मपुरी हे नाव सुरूवातीपासून नव्हते.
मध्ययुगीन कोल्हापूर
ब्रम्हपुरी शहराचा दुसऱ्या शतकात नाश झाल्यावर या भागाचे महत्व कमी झाले इ.स. ५०० पर्यंतच्या शिलालेखात कोल्हापूरचा स्वतंत्र उल्लेख आढळत नाही. इसवी सन २०० ते ८०० पर्यंतच्या काळात कोल्हापूरला राजकीय किंवा धार्मिक महत्त्व नव्हते. म्हणून या सहा शतकांना कोल्हापूरच्या इतिहासाची रात्र असे मानले जाते.
अर्वाचीन काळातील कोल्हापूराची सुरूवात इ.स. १८४४-४८ पासून झाली. इ.स. १८४४ मध्ये ब्रिटीश सरकारने कोल्हापूर शहराच्या संस्थानचा कारभार आपल्या हाती घेतला आणि तो पाहण्याकरिता मेजर ग्रॅहम यांची नेमणूक केली. इ.स. १८४५-८ च्या दरम्यान रेसिडेंसीच्या इमारती बांधल्या गेल्या.
Read Moreकोल्हापूर शहराच्या बाल्यावस्थेपासून १८व्या शतकाया अखेरीपर्यंत शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. कारण शहरात अनेक तीर्थे व तलाव होते व त्यांचे पाणी पिण्यास योग्य होते. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला.
Read More