या पृथ्वीतलावर कोट्यावधी माणसं जन्माला येतात आणि निसर्ग नियमाप्रमाणे काळाच्या ओघात नाहिशी होतात. अशा माणसाच्या आठवणीसुध्दा जगाच्या स्मृतीपटलावरसुध्दा शिल्लक राहत नाहीत.
Read Moreराजर्षी शाहूंच्या ४८ वर्षाच्या आयुष्यात घडलेल्या बहुविध घटनांचा, मग ती घटना अत्यंत क्षुल्लक वाटणारी असो अथवा मोठी असो, मागोवा घेतला तर प्रत्येक घटनेच्या संदर्भाने झालेली कृती जमिनीतून वर येणारा प्रत्येक कोंब नवनिर्मितीच्या प्रेरणा घेऊन जसा बाहेर येतो. त्याप्रमाणे एक नवविचार घेऊन वाटचाल करीत असे असेच आढळून येईल. नवविचारांना कृतीशीलतेतून जन्म देणारा हा राजा खऱ्या अर्थाने कृतीशील विचारवंत होता.
Read Moreराजर्षी शाहू महाराजांनी विषमतेवर पहिला भीमटोला टाकला तो जातीयतेच्या राक्षसाला आव्हान देऊन.गंगाराम कांबळयाच्या हॉटेलात जाऊन स्वत: चहा घेतला आणि राजा जर अस्पृष्यता पाळत नाही तर समाजाने का पाळावी हा संदेश देऊन टाकला. अशा छोट्या छोट्या प्रसंगातून या राजाच्या हिमालयाएवढ्या उंच मनाची कल्पना येते. खरं तर पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे हा माणूस आकाशाएवढा मोठा वाटायला लागतो.
Read Moreशाहू या राजा माणसाने हे पक्केपणाने हेरले आणि आपल्या संस्थानात मन बांधणी करण्याची सुरुवात केली. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा म्हणून सर्वांना शिक्षणाची समान संधी देण्यास त्यांनी अग्रक्रम दिला.
Read More