श्री महालक्ष्मी अंबाबाईचे देवस्थान

कोल्हापूरात सर्वोच्च स्थान कुणाला असेल तर या मातेला, महालक्ष्मीला व देवालयाला आहे. हे श्रीमहालक्ष्मीचे देवालय न उभारले जाते तर आज कोल्हापूर शहरच दिसले नसते. श्री महालक्ष्मीची आशीर्वादानेच श्री. शाहू छत्रपती व श्री राजाराम महाराजांच्यासारखे सुपुत्र जन्माला येऊन या शहराची वाढ व विकासाकरिता त्यांनी प्रयत्न केले.

Read More

त्र्यंबोली अथवा टेंबलाई

शहराच्या पूर्वेला एका छोट्या टेकडीवर काही देवळांचा समूह आहे. तिथेच त्र्यंबोलीचे मंदीर आहे. या टेकडालाही टेंबलाई नावानेच ओळखले जाते.

Read More

बाबू जमाल मशीद

महालक्ष्मी देवालयापासून काही अंतरावर बाबूजमाल दर्गा हा ताराबाई रोडवर लक्ष्मी सरस्वती चित्रमंदिरामागे आहे. हा दर्गा कोल्हापूरात ज्यावेळी सर्व प्रथम मुस्लिम आले त्यावेळी बांधला गेला असावा असा अंदाज आहे.

Read More

बिनखांबी गणेश मंदीर

बिनखांबी गणेश मंदीर किंवा जोशीरावचा गणपती म्हणून प्रसिध्द असलेले हे मंदीर महाद्वार रोडवर आहे. या मंदिराचे मुख्य दोन भाग म्हणजे आतील गाभारा व त्यापुढील मंडप. गाभारा किंवा मंडप यांचे छत हे खांबाच्या आधाराविना उभारलेले आहेत.

Read More

शंकराचार्यांचा मठ

श्रीमद्जगद्गुरू पहिले शंकराचार्य यांनी जे चार मठ स्थापिले, त्यापैकी शृंगेरी मठ एक होय. या मठावर अधिष्ठित असलेल्या श्रीविद्याशंकरभारती यांनी कोल्हापूर येथे शंकराचार्यांचा मठ इसवी सनाच्या १३ व्या शतकात स्थापिला. हा मठ स्थापना करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यावेळी कोल्हापूरला आलेले धार्मिक महत्व हेच होय.

Read More

प्राचीन मंदिर काशी विश्वेश्वर

फार पूर्वीपासून काशी विश्वेश्वर हे मंदिर महालक्ष्मी मंदिराच्या उत्तर बाजूस उभे आहे. मंदिर घाटीदरवाजा परिसरात असून आतील श्री शंकराच्या पिंडीला काशीविश्वेश्वर असे म्हणतात. प्राचीन काळी या मंदिरात अगस्तीमुनी, लोपामुद्रा, राजा प्रल्हाद, राजा इंद्रसेन यांनी दर्शन घेतल्याचा पुरावा करवीर माहात्म्य ग्रंथात आढळतो.

Read More

डोंगरावरील कात्यायनी

कोल्हापूरातील अनेक प्राचीन मंदिरामुळे या नगरीवर एक वेगळा सांस्कृतिक प्रभाव निर्माण झाला आहे. कोल्हापूराच्या मध्यवर्ती देवी महालक्ष्मी मंदिर आणि सभोवताली या देवीच्या रक्षणार्थ पूवाश्रमी इतर देवदेवता अधिष्ठिता झाल्या होत्या.

Read More

कपिलेश्वर मंदिर

फार पूर्वीपासून काशी विश्वेश्वर हे मंदिर महालक्ष्मी मंदिराच्या उत्तर बाजूस उभे आहे. मंदिर घाटीदरवाजा परिसरात असून आतील श्री शंकराच्या पिंडीला काशीविश्वेश्वर असे म्हणतात. प्राचीन काळी या मंदिरात अगस्तीमुनी, लोपामुद्रा, राजा प्रल्हाद, राजा इंद्रसेन यांनी दर्शन घेतल्याचा पुरावा करवीर माहात्म्य ग्रंथात आढळतो.

Read More

कणेरी मठ

कोल्हापूरापासून फक्त १ मैलावर कणेरी हे एक छोटेसे गाव आहे. करवीर तालुक्यातील या गावात एक निसर्गरम्य उंच टेकडी असून तेथे प्राचीन काळी भगवान शंकराची स्थापना झाल्याचे इतिहास सांगतो. २ मैलाचा हा परिसर अत्यंत रमणीय आणि नैसर्गिक असा आहे. साधारणपणे १४ व्या शतकाच्या सुरूवातीला या परिसरात शंकराच्या पिंडीची स्थापना लिंगायत समाजातील धर्मगुरूंनी केली असावी असे बोलले जाते.

Read More

जैन स्वामी मठ

हा मठ शुक्रवार पेठेत असून गंगावेशपासून थोड्याच अंतरावर आहे. या प्राचीन मठाचे प्रवेशव्दार (नगारखाना) जुन्या राजवाड्याच्या नगारखान्यासारखाच असून अतिभव्य व आकर्षक राजवाड्याच्या नगारखान्यासारखा असून अतिभव्य व आकर्षक आहे. या नगारखान्याच्या मोठ्या खांबावर आधारित मनोरे आहेत.

Read More
Translate »