शाहू महाराजांच्या काळात घडलेल्या वेदोक्त प्रकणामुळे ब्राह्मणेत्तरांना वेदोक्त पद्धतीने धर्मविधी करण्याचे ज्ञान देण्यासाठी राजर्षी शाहूंनी 6 जुलै, 1920 ला वरील वैदिक शाळा बिंदू चौकाजवळ सुरू केली.
Read Moreवरुणतीथाजवळील फिरंगाई देवीचे मंदिर असून हे बहुजन समाजाचे दैवत मानले जाते. फिरंगाईस प्रत्यागिरादेवी म्हणूनही ओळखले जाते. भाविक लोक देवीला पीठ, मीठ, हळद आणि तेल अर्पण करतात. पूर्वीच्या काळी देवीसमोर रेडय़ाचा बळी दिला जात असे.
Read Moreशुक्रवार पेठेत पंचगंगा नदीच्या घाटावर जाण्याच्या मार्गावर हा तेराव्या शतकातील प्राचीन शंकराचार्य मठ आहे. हा मठ दुमजली असून त्याच्या बांधणीमध्ये भव्यता किंवा कलाकुसर आढळून येत नाही.
Read Moreब्रम्हेश्वराचे हे प्राचीन मंदिर वरुणतीर्थ वेशीत जनता बझारच्याजवळ आहे. या मंदिराची रचना महालक्ष्मी मंदिरासारखीच आहे. फक्त याला शिखर नाही व ते विस्ताराने लहान आहे.
Read Moreकरवीर माहात्म्य व लक्ष्मीविजय या गं्रथात शेषनारायण विष्णूच्या करवीरच्या सीमेच्या आतील चार म्हणजे अंतर्गृही शेषशायी रूपातील स्थानांची वर्णने आहेत. यातील एक विष्णू मूर्ती महालक्ष्मी मंदिरात पूर्वबाजूस आहे.
Read Moreकोल्हापूर शहराच्या पूर्वेस शाहूमिलजवळ एक मोठा तलाव आहे, या तलावात कोटीतीर्थ या नावाचे एक जुने देवस्थान आहे.
कोल्हापुरातील निसर्गसौंदर्याने नटलेले एक रमणीय स्थान म्हणून कोटीतीर्थाची ओळख आहे. या तलावामध्ये महादेवाचे छोटे मंदिर असून अरूंद अशा मातीच्या भरावाने ते तलावाच्या शहराकडील बाजूच्या मातीच्या बंधार्याशी जोडलेले आहे. मंदिर साधे असून विशेष असे कोरीव काम नाही. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे.
Read Moreविठोबा मंदिराच्या प्रांगणात पूर्वेस असलेले हे मंदिर विठोबा मंदिरापेक्षा मोठे असून या मंदिरावर तुलनेने कोरीव काम जास्त आहे. मंदिराला गर्भगृह, अंतराळ, नंदीमंडप अशी रचना असून अतिशय कलात्मक व शिल्पवैभवाने नटलेली प्रवेशद्वारे हे या मंदिराचे वैशिष्टय़ आहे.
Read More